आगरदांडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आगरदांडा ते नांदले रोह्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबद्दल वाहनचालक व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यापासून या रस्त्यावर खड्डे पडले असून या ठिकाणी काही जणांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. याबाबत येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी बांधकाम खात्याकडे वेळोवेळी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केलीआहे. परंतु, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येते आहे. संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष पुरवून आगरदांडा गावातून नांदले रोह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करावे, अशी मागणी सरपंच आशिष हेदुलकर, उपसरपंच संतोष पाटील, सदस्य युसुफ अर्जबेगी,सुहेल अर्जबेगी, प्रसाद भाटकर, सुर्यकांत तोडणकर, नरेंद्र हेदुलकर, समीप अडुळकर, वाहनचालक व ग्रामस्थ यांनी केली आहे.

Exit mobile version