खोपोली-पळसदरीमार्गे कर्जत रस्त्यावरील खड्डे भरले

| कर्जत | प्रतिनिधी |

खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची काही ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था झाली होती तसेच वरणे गाव पळसदरी रोड आणि डोलवली केळवली दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे मुश्किल झाले होते संबंधित शासकीय खात्याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याने वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात व्हायचे त्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सदर खड्डे पडलेले रस्त्याची दखल घेऊन शिवसेनेच्या वतीने खड्डे भरण्याचे मार्गदर्शन केले. यासाठी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली सर्व खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले , हे सर्व खड्डे बुजवण्यासाठी जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी स्वतः चार मोठे डंपर हायवा जीएसबी मटेरियल दिले.

तसेच ते मटेरियल पसरवण्यासाठी जयेंद्र देशमुख तात्या रिठे यांच्यावतीने जेसीबी पुरवण्यात आले. सदरच्या उपक्रमासाठी हरीश काळे, राजू गायकवाड, संदीप भोईर, रेश्मा आंग्रे, विलास महाबदी व देशमुख आणि संदीप हडप व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदरचा उपक्रम राबविण्यासाठी आदरणीय आमदार महेंद्र थोरवे त्याचप्रमाणे मनोहर थोरवे, दिनेश थोरवे, नगरसेवक संकेत भासे यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

Exit mobile version