कर्जत शहरातील श्रीराम पुलावरील खड्डे भरले

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहरातील उल्हास नदीवर असलेल्या श्रीराम पुलावर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक मंदावली होती आणि अपघाताची शक्यतादेखील निर्माण झाली होती. मात्र, माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी पुढाकार घेऊन पुलावरील ते खड्डे भरल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील श्रीराम पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्याचवेळी वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि प्रवासातील असुविधा यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. स्थानिकांची अडचण लक्षात घेवून कर्जत पालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी त्वरेने या समस्येची दखल घेतली. त्यांनी संबंधित प्रशासनाशी चर्चा करून तात्काळ खड्डे भरण्याचे आदेश दिले. खड्डे भरण्याचे काम सुरळीत पार पडले आणि त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते वाहतूक आता सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. आता रस्त्यांवर चालताना आणि वाहन चालवताना खूपच सुरक्षित प्रवास करीत आहेत.

Exit mobile version