वावेघर रस्त्यावरील खड्डे स्वखर्चातून भरले

जगदीश पवार यांनी जपली सामाजिक बांधिलकी

| रसायनी | वार्ताहर |

दांड-रसायनी रस्त्यावरील वावेघर थांब्यानजीकच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. येथील खड्डेमय रस्त्यावरुन वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागायचा. ही समस्या सावळे गावचे जगदीश पवार यांनी लक्षात घेतली. त्यांनी स्व-खर्चाने बुजवण्याचे काम हाती घेतले.

शेतकरी कामगार पक्षाचे गुळसुंदे विभागातील नेते आणि पनवेल पंचायत समितीचे सदस्य जगदीश पवार यांनी त्यांची स्वत:ची जेसीबी व खडी-माती टाकून रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम केले. जगदीश पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल रसायनी पंचक्रोशीतील वाहन चालकांना, विद्यार्थ्यांना, कामगारांना, रिक्षचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत शेकापचे युवा नेते चंदर माने, युवा नेते सुहास माळी, पुरोगामी युवक संघटनेचे रसायनी विभागाचे अध्यक्ष भास्कर गाताडे, मधुकर तांडेल, सावळे गावचे युवक अध्यक्ष चेतन म्हात्रे, उपाध्यक्ष मदन मते तसेच वावेघर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वाहनचालक व प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version