पोल्ट्री कर्मचार्‍याचा शॉक लागून मृत्यू

| पाताळगंगा | वार्ताहर |
बीडखुर्द येथील वरदविनायक पोल्ट्री फार्म  शुक्रवारी (8 एप्रिल)  पोल्ट्रीमध्ये काम करणार्‍या ग्रेगोरी सिलबेरियुस तिर्की या कामगाराचा शाँक लागून मृत्यू झाला.
  कामगाराचे मृतदेह अंतिम विधीसाठी छत्तीसगढ येथील त्याच्या गावी पाठविण्यात आले असून या मृत कामगाराच्या कुटुंबाची जबाबदार पोल्ट्री व्यवसायिकाने घेतल्याने तणाव निवळला अंतर्गत दुरुस्तीचे काम सुरू असताना  शॉक लागून मृत्यू झाला आहे. ग्रेगोरी तिर्की, वय.31,  हा तरुण कामगार पोल्ट्री मधील आपले दैनंदिन काम करीत असताना त्याला विजेचा शॉक बसून तो खाली पडला  याबाबत खोपोली पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा व मृत व्यक्तींच्या नातेवाईक व अन्य कामगारांचे जबाब नोंदवून पुढील चौकशी सुरू आहे.

Exit mobile version