पावसामुळे वीज महावितरणचे नुकसान

। रसायनी । वार्ताहर ।

वादळी पावसामुळे वीज पडल्याने बुधवारी महावितरणच्या वासांबे मोहोपाडा कार्यालयांतर्गत येणार्‍या गावांत महावितरणच्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले.

तळेगाव वाडीला वीजपुरवठा करणारे रोहित्र जळाले आणि कळणाची वाडीजवळ विजेच्या झटक्याने उच्च दाबाच्या वीज वाहिन्याच्या मार्गावरील खांबाचा इन्सुलेटर फुटला. परिणामी, तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात विजेअभावी नागरिकांची गैरसोय झाली. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तातडीने इन्सुलेटर बदली केले. त्यानंतर रात्री पावणे नऊ वाजता वासांबे-मोहोपाडा आणि बाजुच्या गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तोपर्यंत तळेगाव वाडी येथील नागरिक अंधारात होते.

वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता; मात्र महावितरणच्या कर्मचार्‍यांनी चार इन्सुलेटर बदली करून रात्रीच वासांबे-मोहोपाडा परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत केला. तसेच तळेगाव वाडीचे जळालेल्या रोहित्राच्या ठिकाणी दुसरे रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

किशोर पाटील, सहायक अभियंता, वासांबे
Exit mobile version