कर्जतमधील वीज पुरवठा बंद

। कर्जत । प्रतिनिधी ।

महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात तसेच शहरातील सडलेले आणि वाकलेले पोल बदलण्याच्या तांत्रिक कामाकरीता कंपनीने शुक्रवारी (दि.27) आठ तासाचा बंद घेऊन काम सुरू केले होते. दरम्यान, खोपोली ते भिसेगाव उपकेंद्रापर्यंत असलेल्या इनमिंग लाईनवरील कंडक्टर बदलणे व त्याचे मजबुतीकरण करणे, उपकेंद्राच्या परिसरात असलेल्या झाडाच्या त्रासदायक फांद्या तोडणे, कर्जत शहरातील गंजलेले पोल आणि वाकलेले पोल बदलणे या तांत्रिक कामासाठी वीज वितरण कंपनीकडून बंद घेण्यात आला होता. याबाबतची पूर्वकल्पना सोशल मीडियावरून देण्यात आली होती.

Exit mobile version