पॉवरलिफ्टर अमृता भगतचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

| नेरळ | प्रतिनिधी |

विदर्भ पॉवरलिफ्टर इंडिया असोसिएशन कडून राष्ट्रीय पावरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेत क्लासिक गटात कर्जत तालुक्यातील शेलू गावातील खेळाडू अमृता भगत हिने दुसरा क्रमांक मिळविला.

विदर्भ पॉवरलिफ्टींग इंडिया असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्यातील शेलू येथील खेळाडू आणि नेरळ येथील महाविद्यालयाची विद्यार्थिनी अमृता ज्ञानेश्‍वर भगत हिने दुसर्‍यांदा राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत क्लासिस गटात भाग घेणार्‍या दुसरा क्रमांक राष्ट्रीय स्पर्धेत मिळवून पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी केली.

अमृता भगत हिला रायगड पॉवर लिफ्टिंग असोसिएशन चे प्रशिक्षक विक्रांत गायकवाड, अरुण पारकर, गिरीश वदक यांचे मार्गदर्शन राहिले. या स्पर्धेत उडीसा राज्याची सुशमा राँय हिने प्रथम क्रमांक मिळविला तर तेलंगणा राज्याच्या खेळाडूला तिसरा क्रमांक मिळाला.

Exit mobile version