। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौल सागमळा येथील रहिवासी, शिवलकर कला केंद्राचे मालक प्रभाकर मोरेश्वर शिवलकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. 26 एप्रिल रोजी निधन झाले. निधनसमयी ते 68 वर्षांचे होते. शिवलकर कला केंद्रातून त्यांनी विविध आकाराच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर चौलमळा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कै.प्रभाकर शिवलकर यांचा दशक्रिया विधी गुरूवार, दि.5 मे रोजी, तर उत्तरकार्य विधी रविवार, दि. 8 मे रोजी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
प्रभाकर शिवणकर यांचे निधन
