कलाकारांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न
| अलिबाग | प्रतिपिधी |
शेकाप सरचिटिणीस जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी पीएनपी कलाविकास मंडळ अलिबाग अंतर्गत ग्रामीण रंगभूमीतर्फे रविवारी (दि.13) ‘प्रभाकरंडक 2025′ एकपात्री अभिनय स्पर्धा पीएनपी नाट्यगृहात पार पडली. या स्पर्धा पीएनपी कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील व चित्रपट दिग्दर्शक तथा संगीतकार विक्रांत वार्डे यांच्या प्रेरणेतून ग्रामीण रंगभूमीचे अध्यक्ष राजन पांचाळ यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.
या स्पर्धेत बालगटात दुर्वा झावरे हीने प्रथम क्रमांक पटकावला. तर, मोठ्या गटात श्रुती नाईक प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. या स्पर्धेचे उद्घाटन नागेश कुलकर्णी आणि रमेश धनावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अलिबागमधील नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकार उपस्थित होते. या स्पर्धेत ग्रामीण भागातील एकूण 48 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परिक्षण प्रदीप गोगटे आणि नरेंद्र ठाकूर यांनी केले. सुत्रसंचालन देवेंद्र केळूसकर आणि जितेंद्र पाटील यांनी केले. तर, प्रास्ताविक सागर नार्वेकर यांनी केले. विक्रांत वार्डे यांनी स्पर्धकांना आणि उपस्थितांना आपल्या भाषणात ग्रामीण रंगभूमीच्या आगामी उपक्रमांची माहीती दिली. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात ग्रामीण रंगंभूमीचे सचिव प्रतिक पानकर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रंगभूमीचे पदाधिकारी राजेंद्र झावरे, संकल्प केळकर, सागर नार्वेकर, अश्रीता बारसे, संचित पानसरे, तन्वी पाटील, मयुर मोरे, तुषार पाटील, ऋषीकेश पडवळ, यश पाटील व नितेश पाटील यांनी खुप मेहनत घेतली.
ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. या स्पर्धेत बालगटात प्रथम क्रमांक दुर्वा झावरे, द्वितीय क्रमांक आराध्य पाटील, तृतीय क्रमांक अनन्या प्रभाळे, तर उत्तेजनार्थ बक्षीस नव्या वर्तक व अंश ठाकूर यांनी पटकावले आहे. तसेच, मोठ्या गटात प्रथम क्रमांक श्रुती नाईक, द्वितीय क्रमांक अभिषेक पाटील, तृतीय क्रमांक मनाली इंगळे, तर उत्तेजनार्थ बक्षीस चेतन पाटील, सायली पाटील व कृतिका पाटील यांनी पटकावले आहे. विजेत्यांना चित्रलेखा पाटील व शेकापचे मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी पीएनपी नाट्यगृहात ग्रामीण नाट्य मंडळाचा भव्यदिव्य असा ‘प्रभाकरंडक’ नाट्य महोत्सव घेणार असल्याचे जाहीर केले आहे.





