जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन

| अलिबाग । वार्ताहर ।

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन डॉ. महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी, रायगड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे नियोजनानुसार करण्यात आले. सदर रॅलीस उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन सर्जेराव मस्के – पाटील, पोलीस अधीक्षक रायगड यांचे प्रतिनिधी श्री. काकडे, ऍड. अमोल शिंदे, अनिरुद्ध खाडिलकर यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. या प्रभात फेरीकरिता शासकीय वैदयकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, संतोष वझे, प्रमोद देशमुख, अध्यक्षा ऍड. कला पाटील, ऍड. निहा राऊत या उपस्थित होत्या.प्रभात फेरीकरीता जे.एस.एम. कॉलेज, पी.एन.पी. कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, नर्सिंग स्कूलच्या विद्याथी विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी आपली एकता, आपली समानता, एचआयव्ही सह जगणार्‍यांकरिता या थिमवर आधारित जनजागृती करण्यात आली.

यावेळी जिल्ह्यातील कार्यरत असणार्‍या व नाविन्यपूर्ण सामाजिक बांधिलकी जपून प्रोत्साहनपर काम केलेबद्दल डॉ. नालंदा पवनारकर, एआरटी वैद्यकीय अधिकारी याना उपजिल्हाधिकारी, सर्जेराव मस्के – पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मागील सन 2021-22 मध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आयसीटीसी 1, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील समुपदेशन अर्चना जाधव याना गौरविण्यात आले.

प्रभात फेरीची सांगता झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विध्यार्थी करिता एचआयव्ही/एड्स विषयी मूलभूत माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्हीचा प्रतिबंध, एचआयव्ही संसर्गितांसाठी सेवा सुविधा एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम, एचआयव्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी, एचआयव्ही कसा होता, काय केल्याने होत नाही, एचआयव्ही होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी याबाबत संजय माने, यांनी माहिती दिली.

सदर कार्यक्रमास रवींद्र कदम, रश्मी सुंकले, संपदा मळेकर सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, अर्चना जाधव, सचिन जाधव, कल्पना गाडे, रामेश्‍वर मुळे, गणेश सुतार, अतिश नाईक, रुपेश पाटील, हेमकांत सोनार, महेश घाडगे, दीप्ती चव्हाण, कोमल लोखंडे, सायली म्हात्रे, पल्लवी पडवळ, प्रेमा खंडागळे, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार, यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय माने यांनी केले.

Exit mobile version