रायगड प्रीमिअर लीगसाठी सराव सामने

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड प्रीमिअर लीगने आयोजित केलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई आणि खारघर येथील नामचिन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या प्रथम दर्जाच्या संघाबरोबर हे सराव सामने होणार आहेत.
आरपीएल स्पर्धेसाठी नोंदणीकृत झालेल्या सर्व रायगड जिल्ह्यातील महिला खेळाडुंना ही आणखी एक संधी आरपीएलने उपलब्ध करून दिली आहे. क्रिकेट खेळ आणि खेळाडुंचा दर्जा सुधारावा म्हणून आरपीएलच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत. मुलांच्या बरोबरीने मुलींनादेखील उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळण्यास मिळावे म्हणूनच मुंबई आणि खारघरच्या महिला क्रिकेट संघाबरोबर सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सराव सामन्यांमध्ये मिळणार्‍या अनुभवाचा फायदा रायगडमधील नवोदित महिला क्रिकेट खेळाडूंना आपली कामगिरी आणि स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी मदत करेल, अशी अपेक्षा आयोजक आणि पालकांना आहे. सराव सामने दि. 4 जूनपासून रायगड आणि नवी मुंबईतील मैदानावर होणार आहेत. रायगड प्रीमिअर लीग महिला क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

Exit mobile version