रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये होणार ‘प्रधान मंत्री फसल बिमा योजने’ची अंमलबजावणी

एचडीएफसी एर्गोमार्फत योजना राबली जाणार
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
महाराष्ट्र सरकारने प्रधान मंत्री फसल बिमा योजना (पीएमएफबीवाय) अंमलात आणण्याचे अधिकार एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या भारतातील खाजगी क्षेत्रातील नॉन-लाइफ विमा पुरवणा-या कंपनीला प्रदान केले आहेत. रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांतील कर्ज घेतलेल्या तसेच कर्ज न घेतलेल्या शेतक-यांना 2021-22 च्या रबी हंगामासाठी ही योजना पुरवली जाणार आहे.
पीएमएफबीवाय योजना दुष्काळ, पूर, कोरडेगवत, भूस्खलन, चक्रीवादळ, गारपीट, महापूर, कीटक, रोग आणि इतर यांसारख्या व्यापक धोक्यांमुळे पीक उत्पादनामध्ये होणा-या नुकसानासाठी शेतक-यांना विमा पुरवते.उत्पादनामध्ये झालेल्या नुकसानाची तपासणी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार योजनेसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या भागांमधील अधिसूचित पीकांवर क्रॉप कटिंग एक्स्परिमेण्ट्सचे (सीसीई) नियोजन व आयोजन करेल. करण्यात आलेल्यासीसीईंमधून उत्पादन कमी असल्याचे आढळून आल्यास शेतक-यांचे उत्पादन कमी झाल्याचे मानण्यात येईल, ज्यासाठी शेतक-यांना क्लेम्स देण्यात येतील.
रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांमधील शेतकरीवर ही योजना लागवडपूर्व, लागवडीदरम्यान व लागवडीनंतर अशा पीक चक्राच्या सर्व टप्प्यांदरम्यान होणा-या नुकसानांसाठी विमा संरक्षण देते.
योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळवण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यांमधील संबंधित बँका, कॉमन सर्विस सेंटर्स (सीएससी) यांच्याकडे जाऊ शकतात किंवाअधिकृत एचडीएफसी एर्गो एजंट्सशी संपर्क साधू शकतात. विमा संरक्षण मिळवण्यासाठी वैधता कालावधीची सविस्तर माहिती शेतक-यांसाठी कृषी विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.
एचडीएफसी एर्गो आणि कंपनी ऑफर करत असलेली उत्पादने व सेवांबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर www.hdfcergo.com माहिती उपलब्ध आहे.

पीकांसाठी रायगड जिल्ह्यामध्ये देय हप्त्याची रक्कम आणि अंतिम मुदत याबाबत सविस्तर माहिती-

Exit mobile version