प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

रायगडात 21 कोटी 73 लाखांचे वितरण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
केंद्र पुरस्कृत मप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सोमवारी ( 27 फेब्रुवारी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री तहसिलदार सचिन शेजाळ यांच्या समन्वयाने रायगड जिल्ह्यातील अंदाजे 1 लाख 8 हजार 654 पात्र लाभार्थ्यांना रु.21 कोटी 73 लाख 8 हजार इतकी लाभाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

राज्य शासनाकडील शासन निर्णयान्वये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता, केंद्र शासनाने सुरु केलेली केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राज्यात 1 डिसेंबर 2018 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण रु.6 हजार प्रती वर्ष लाभ देण्यात येत आहे. त्यानुसार रायगड जिल्हयात या योजनेंतर्गत माहे फेब्रुवारी 2019 पासून एकूण 1 लाख 75 हजार 612 लाभार्थ्यांची नोंदणी आली आहे. केंद्र शासनातर्फे फेब्रुवारी 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 12 हप्त्यांमध्ये रक्कम रु. 2 अब्ज 92 कोटी 42 लाख 92 हजार इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

Exit mobile version