प्रज्ञानंदने जगज्जेता गुकेशला नमवले

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

टाटा चेस मास्टर स्पर्धेत रविवारी (दि.2) बुद्धीबळपटू 19 वर्षीय आर प्रज्ञानंदने इतिहास रचला आहे. त्याने जगज्जेता डी गुकेशचा पराभव करून टाटा स्टील चेस मास्टर्स 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. या पराभवानंतर गुकेश अवस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. या पराभवाचा मोठा धक्का बसल्याचे गुकेशच्या चेहर्‍यावर दिसत होते. सामना गमावताच छताकडे पाहत बसलेल्या गुकेशचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 13व्या फेरीत दोन्ही ग्रँडमास्टर्सना पाराभव पत्कारावा लागला होता. अर्जुन इरिगसीने गुकेशला 31 चालींमध्ये पराभूत केले. तर, व्हिन्सेंट कीमरने सात तासांच्या मॅरेथॉनमध्ये आर प्रज्ञनंदाला मागे टाकले. मात्र, गुकेशविरूद्ध प्रज्ञानंद अशा लढतीत गुकेशने बाजी मारली व मास्टर्स ठरला. ब्लिट्झ प्लेऑफमध्ये, गुकेशने पहिला गेम जिंकला. मात्र, नंतर पुढच्या गेममध्ये प्रज्ञनंदाकडून त्याला पराभव पत्करावा लागला. डी गुकेश आधी आघाडीवर होता; परंतु शेवटच्या गेममधील खराब कामगिरीमुळे त्याला सामना गमवावा लागला. अंतिम टायब्रेकर गेममध्ये गुकेशने हार पत्करली आणि त्याच्या चेहर्‍यावर धक्कादायक भाव दिसून आले.

Exit mobile version