प्रज्ञानंद स्पर्धेसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताचे महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी युवा खेळाडू आर. प्रज्ञानंद याच्या खेळावर विश्वास व्यक्त करताना म्हटले की, आर. प्रज्ञानंद याची लय हरवली असली तरी आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी तो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेला 28 मार्चपासून सायप्रस येथे सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पुरुष विभागात आर. प्रज्ञानंदच्या रूपात भारताचे एकमेव आव्हान असणार आहे. आव्हानवीरांच्या स्पर्धेमध्ये अव्वल आठ खेळाडूंमध्ये जेतेपदासाठी रस्सीखेच लागणार आहे. या स्पर्धेतील विजेता खेळाडू विश्वविजेता डी. गुकेश याला आव्हान देईल. विश्वविजेतेपदाची लढत या वर्षअखेरीस होणार आहे. विश्वनाथन आनंद हे सध्या फिडे अर्थातच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आर. प्रज्ञानंदच्या खेळाबाबत प्रश्न विचारल्यानंतर विश्वनाथन आनंद म्हणाले की, आर. प्रज्ञानंद याच्याकडे चांगला अनुभव आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या खेळातील सूर हरवला आहे. तरीही आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी तो मानसिकदृष्ट्‌‍या सक्षम असणार आहे. त्यामुळे या खेळाडूंकडे विजेतेपदाची संधी अधिक असणार आहे. सध्या मी विजेतेपदासाठी एका खेळाडूच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकत नाही. तीन महिला लढणारआव्हानवीरांच्या महिला विभागातील स्पर्धेत भारताकडून तीन खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. कोनेरु हंपी, दिव्या देशमुख व आर. वैशाली या तीन खेळाडूंकडून भारताला विजेतेपदाच्या अपेक्षा असणार आहेत.

Exit mobile version