प्रज्ञा बोधनकर यांना पीएच.डी

| खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील प्रज्ञा मिलिंद बोधनकर यांना मुंबई विद्यापीठाकडून नॅनो विज्ञान व नॅनो तंत्रज्ञान या विषयातील पीएच. डी प्राप्त करण्यात आली आहे. त्यांनी शेप, साइझ अँड मॉर्फोलॉजी कंट्रोल मेटल/ मेटल ऑक्साईड बेस्ड नॅनो कॅटालिस्ट फॉर इलेक्ट्रो केमिकल वॉटर स्प्लिटिंग या विषयावर प्रा. डॉ. प्रदिप सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी प्रबंध पूर्ण केला. यासाठी त्यांना डॉ. दत्तात्रय ढवळे (सायंटिस्ट – ऑस्ट्रेलिया) यांचेही मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पासाठी त्यांना डिपार्टमेंट ऑफ सायंन्स अँड टेक्नॉलॉजी, दिल्लीकडून वुमन सायंटिस्ट – ए योजने अंतर्गत अनुदान मिळाले होते. हे संशोधन नावीन्य पूर्ण असल्याने त्यावर आधारित त्यांची सहा प्रकाशने युरोपियन नियतकालिकात प्रकाशित झाली आहेत.सध्या त्यांचे पोस्ट डॉक्टरेट साठी प्रोजेक्टचे काम चालु आहे.

Exit mobile version