भारताचे पहिले ग्रँडमास्टर बहीण-भाऊ
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वैशाली रमेशबाबू ही भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे. तिने 2500 गुण मिळवत ही कामगिरी केली. या कामगिरीबरोबरच वैशाली आणि तिचा लहान भाऊ प्रज्ञानंदा हे दोघेही बुद्धिबळाच्या इतिहासातील पहिले ग्रँडमास्टर भाऊ-बहीण झाले आहेत. या दोघांनी बुद्धिबळाच्या पटावरील आपली क्षमता सिद्ध करीत ग्रँडमास्टर होण्याचा पराक्रम नोंदवला आहे.
वैशालीचं पाहूनच प्रज्ञानंदा हा बुद्धीबळाकडे वळला होता. मात्र, ज्यावेळी प्रज्ञानंदा हा 2018 ला दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर झाला, त्यानंतर प्रज्ञानंदा हा प्रकाशझोतात आला. मात्र, त्याची बहीणदेखील उत्तम बुद्धीबळपटू आहे. आज तिच्या कामगिरीने प्रज्ञानंदासोबत ती देखील प्रकाशझोतात आली आहे. प्रज्ञानंदाची बहीण वैशाली वयाच्या 22 व्या वर्षी अखेर प्रज्ञानंदाच्या सावलीतून बाहेर पडली आहे. त्याची गुणवत्ता आणि कामगिरी कमी नव्हती. ती 15 व्या वर्षी महिला आंतरराष्ट्रीय मास्टर, 17 व्या वर्षी वुमन ग्रँडमास्टर आणि 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर झाली आहे.
एका वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार, वैशालीच त्यांच्या कुटुंबात पहिल्यांदा बुद्धिबळ खेळायला लागली. ती प्रज्ञानंदापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. तिने आता भारताचा 12 वर्षाचा दुष्काळ संपवला. ती भारताची तिसरी फिमेल ग्रँडमास्टर बनली आहे. यापूर्वी कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावली या दोघी फिमेल ग्रँडमास्टर झाल्या आहेत.