| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील दादरपाडा येथील नेव्हल अर्मामेंट डेपो करंजा येथून आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेले प्रकाश बाळू मोहिते यांचा नुकताच सेवानिवृत्ती सोहळा संपन्न झाला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा दादरपाडा येथे आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त महाप्रबंधक (भा.नौ.आ.से.) पी. कुप्पूसामी, उपमहाप्रबंधक क्षेपणास्त्र प्रशांतशेखर सिंग, फोरमन एन.के. विश्वकर्मा तसेच वरिष्ठ भंडार अधीक्षक आशिष शर्मा, संजय सिंग, योगेश म्हात्रे, मिलिंद थळी, अविनाश मुरुडकर, सुजित शिरदोनकर, युनियन प्रतिनिधी दीनदयाळ गवस, सुनील मोहोकर, महादेव बंडा, सुरेश बंडा, मुक्ता प्रकाश मोहिते, प्रथमेश मोहिते, पूजा मोहिते, कमलाकर चिमणे, विष्णू मोहिते, पद्माकर पाटील, सुभाष ठाकूर, ऋषिकेश मोहिते, भारती मोहिते, सुभाष मोहिते, शुभांगी मोहिते, मनोहर भगत, अनिल डोंगरे, विजयकुमार गोवारी, विलास पाटील, जयदेव ठाकूर, वसंत मोहिते, अजित, विलास, नारायण पाटील, मदन पाटील,अजय मुंबईकर, देवांगना मुंबईकर, प्रदीप तांडेल, प्रकाश मुंबईकर, जगदीश गावंड, रमण कासकर, रवींद्र कासुकर, मदन पाटील तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका देवांगना मुंबईकर यांनी केले.