प्रमिला हिरवे बेपत्ता

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील शीघ्रे ग्रामपंचायत अंतर्गत पारगाण येथे राहणारी प्रमिला राम हिरवे ही महिला दि. 11 मार्च रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ही महिला मतिमंद आहे. ती अंगाने सडपातळ, भगव्या रंगाचा टॉप व भगव्या रंगाची लेगीज, पायात पैंजण, कानात सोन्याच्या रिंग व हातात बांगड्या आहेत. तिच्या हातात मेहंदीचा कोन होता. तो जंगल भागात हरविल्याने सदरील मेहंदीचा कोन आण्याकरिता पारगाण येथील जंगल भागात गेली असता ती रस्ता चुकल्याने हरवली आहे. याबाबतची तक्रार तिचा भाऊ भूषण हिरवे यांनी दाखल केली आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.व्ही. आंबेतकर करीत आहेत.

Exit mobile version