। अलिबाग । प्रतिनिधी ।
दर्पण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त तसेच न्युज जर्नालिस्ट असोसिएशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दैनिक कृषीवलचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद जाधव यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून समस्त कृषीवल परिवाराकडून अभिमान व्यक्त केला जात आहे.







