लायन्स क्लब पोयनाडच्या अध्यक्षपदी प्रमोद पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
लायन्स क्लब ऑफ पोयनाड यांच्या नूतन कार्यकारिणाचा 2021-22 करिताचा पदग्रहण समारंभ गुरुवार, 8 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभात लायन्स क्लब ऑफ पोयनाडचे नूतन अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पदग्रहण करुन पदाची सूत्रे घेतली. यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले.

लायन्स क्लब पोयनाडचा पदग्रहण समारंभ पांडावादेवी-पोयनाड येथील हॉटेल पाटील ब्रदर्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लुनकरन टावरी, फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मुकेश तनेजा, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जाधव, एक्झीटिव्ह कॅबिनेट सेक्रेटरी नयन कवळे, एक्झीटिव्ह कॅबिनेट ट्रेझरर अनिल म्हात्रे, रिजन चेअरपर्सन अरविंद घरत, झोन चेअरपर्सन प्रियदर्शिनी पाटील, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी ज्योती नार्वेकर, नोडल ऑफिसर जीएमपी रायगड प्रदीप सिनकर, नूतन अध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष मनोहर चवरकर आदींसह मांडवा लायन्स क्लबच्या अध्यक्षा विद्या अधिकारी, उपाध्यक्ष मोहन पाटील, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, सुबोध राऊत, अमिष शिरगावकर, पोयनाडचे मनीष अग्रवाल, कौस्तुभ जोशी, प्रमोद राऊत, अरविंद अग्रवाल, महेंद्र पाटील, भगवान मालपाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष विनोेद पाटील, सचिव प्रगती सिनकर, खजिनदार विकास पाटील, तसेच कार्यकारिणी संचालक म्हणून मनोज जैन, रामचंद्र कामथे, दिलीप गाटे, सतीश पाटील, कुशल अग्रवाल, ममता अग्रवाल, मनोहर चवरकर, मृगांता पाटील यांनी शपथ घेतली. तसेच पाच नवीन सदस्यांनाचा शपथविधी झाला. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लुनकरन टावरी यांनी नवीन पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करुन त्यांना शपथ दिली, तर फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मुकेश तनेजा यांनी नवीन सभासदांना मार्गदर्शन करुन त्यांना शपथ दिली. प्रारंभी लायन्स हेल्थ फाऊंडेशनेचे अध्यक्ष अनिल जाधव, झोन चेअरपर्सन प्रियदर्शिनी पाटील, रिजन चेअरपर्सन अरविंद घरत, एक्झीटिव्ह कॅबिनेट ट्रेझरर अनिल म्हात्रे आदींनी आपल्या मनोगतात लायन्स क्लब पोयनाडच्या पदाधिकार्‍यांना शुभेच्छा देऊन लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले. माजी अध्यक्ष मनोहर चवरकर यांनी आपल्या कार्यकाळातील समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला. ध्वजवंदना मनीष अग्रवाल यांनी, तर स्वागतगीत प्रगती सिनकर यांनी सादर केले. आभार प्रदर्शन विकास पाटील यांनी केले. याच कार्यक्रमात सहा आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच संपर्क बालग्राम या अनाथाश्रमास अन्नदानही करण्यात आले.

Exit mobile version