। मुंबई । वृत्तसंस्था ।
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने दमदार विजय मिळवल्यानंतर गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल असा सवाल विचारला जात होता. त्यातच विश्वजित राणे यांनी काही काळ यात रंगत निर्माण केली होती. मात्र, आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.