खोपटेच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रमोद ठाकूर

। उरण । वार्ताहर ।
ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त खोपटेच्या अध्यक्षपदी प्रमोद पांडुरंग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायतच्या विशाखा ठाकूर, सुजित म्हात्रे, रुपम गावंड, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सात पाड्याचे अध्यक्ष उपस्थित होते. ग्रामसुधारण मंडळ खोपटेचे सचिव कुमार ठाकूर ग्रामस्थाचे आभार मानले. यावेळी ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, गावातील माझ्याकडे येणारे वाद असतील, तंटे असतील ते सामोपचाराने सोडवण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न करेन.

Exit mobile version