प्राण् शिक्षक संघाची उद्या पनवेलमध्ये शिक्षण परिषद

मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे मार्गदर्शन
। पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने शिक्षण परिषद व भव्य वार्षिक अधिवेशन शुक्रवारी 18 मार्चला कर्नाळा स्पोर्ट संकूल येथे आयोजित करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या शिक्षण परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून शिक्षण परिषदेला संबोधित करणार आहेत. अशी माहिती आयोजक आ.बाळाराम पाटील, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंबादास वाजे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्य सरचिटणीस बाबासाहेब जगताप, राज्य प्रतिनिधी अविनाश म्हात्रे, म. ज.मोरे मंचावर उपस्थित होते. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी शिक्षण परिषदेचे आयोजनाबाबत विस्ताराने प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. शिक्षण परिषदेचे स्वागताध्यक्ष आ. बाळाराम पाटील हे असून, शिक्षण परिषदेसाठी दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, आदिती तटकरे, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील,खा. सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आ रोहित पवार, आमदार निलेश लंके, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पनवेल चे महापौर कविता चौतमोल उपस्थित राहणार.

Exit mobile version