|उरण । वार्ताहर ।
भेंडखळ गावात श्री हनुमान मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कळश रोहण सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यामुळे संपूर्ण भेंडखळ गावातील वातावरण भक्तीमय होऊन, तिर्थस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. भेंडखळ गावातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमान मंदिराची दुरवस्था झाली होती. सदर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम भेंडखळ ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून हाती घेतले होते आणि एक वर्षात नव्या मंदिराची उभारणी केली.
हनुमान मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना
