| अलिबाग | प्रतिनिधी |
गोवा येथे झालेल्या आय सी एन इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील प्रणव उमेश पुजारी याने वेगवेगळ्या कॅटॅगिरीत नवलौकिक करून 2026 मध्ये आयसीएनच्यावतीने होणाऱ्या शोसाठी पात्रता मिळवली आहे. या त्याचा कामगिरीबद्दल गोंधळपाडा ग्रामस्थ आणि अलिबाग तसेच जिल्ह्यातील बॉडीबिल्डरकडून कौतुक होत आहे. प्रणवने बॉडीबिल्डिंग कॅटॅगिरीत तिसरा क्रमांक, पुरुष फिजिक कॅटॅगिरीत 4 था क्रमांक, पुरुष फिटनेस मॉडेल कॅटॅगिरीत सुवर्णं पदक, प्रो क्वालिफिकेशन स्पर्धेत 30 स्पर्धकातून तिसरा येण्याचा मान पटकवला आहे. या त्याच्या कामगिरीबद्दल त्याची पुढील वर्षी गोवा येथे होणाऱ्या आयसीएनशो 2026 साठी निवड झाली आहे. प्रणवने अनेक जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक बक्षीस पटकवली आहेत.







