| नवी दिल्ली | वार्ताहार |
तेलंगणाच्या 15 वर्षीय प्रणीतने बाकू ओपन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अमेरिकेच्या ग्रँडमास्टर हंस नीमनचा पराभव करीत ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान पटकावला आहे. तो आता भारताचा 82 वा आणि तेलंगणा राज्याचा सहावा ग्रँडमास्टर ठरला आहे. या युवा बुद्धिबळपटूने गत मार्च महिन्यात पहिले मानांकन मिळवले होते. याठिकाणी त्याने इंटरनॅशनल मास्टर होण्याचा पराक्रम गाजवला होता. आता त्याची बाकु ओपनमधील कामगिरी सरस ठरली आहे. त्याने या स्पर्धेतील फेरीमध्ये अचुक चालीवरून विजयाची नोेंद केली.







