प्राणिक हिलिंग कार्यशाळा

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल मध्ये बेसिक प्राणिक हिलिंग कार्यशाळा ही (दि.27) आणि (दि.28) एप्रिल आयोजित करण्यात आली आहे. प्राणिक हिलिंग हि एक विना स्पर्श विना औषधी उपचार पद्धती असून विविध शारीरिक, मानसिक आजारांमध्ये फलदायी ठरते. जगातील 108 देशांमध्ये याचे लाखो उपचारक कार्यरत आहेत. मैत्रेय प्राणिक हिलिंग सेंटर तर्फे बेसिक प्राणिक हिलिंग कार्यशाळा पनवेल मध्ये (दि. 27) व (दि.28) एप्रिल या दोन दिवसांसाठी आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे स्वरूप प्रशिक्षणाचे असल्यामुळे यामध्ये स्वतः चे व इतरांचे हिलींग, दूरस्थ हिलिंग,ऑरा व चक्र यांची माहिती, त्यांना स्पर्श व त्यांचे परीक्षण करणे तसेच कर्माचा सिद्धांत यांसारख्या बर्‍याच गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.

हि कार्यशाळा वर्ल्ड प्राणिक हिलिंग फाउंडेशन च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार असून त्यांच्या अधिकृत प्रशिक्षकाद्वारे हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचे इंटरनॅशनल प्रमाणपत्र सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात येईल. याबद्दल अधिक माहितीसाठी मैत्रेय प्राणिक हिलिंग सेंटरच्या मेघना कदम यांच्याशी 8369765907/9867184207 या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version