प्रणिता काबाळे सेवानिवृत्त

रवींद्र घरत, जितेंद्र पाटील यांच्याकडून कार्याचा गौरव

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावच्या अंगणवाडी सेविका प्रणिता काबाळे यांनी 20 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम रविवार, दि. 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कृष्णादेवी मंदिरात पार पडला. यावेळी गावप्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील यांच्यासह उपस्थितांनी बाईंच्या कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावप्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, चौल ग्रा.पं. सदस्य शशिकांत म्हात्रे, भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, माजी अध्यक्ष संदीप घरत, गावचे खजिनदार अल्पेश घरत, सचिन गोंधळी, महेश पाटील, गावचे प्रतिष्ठित अनंत घरत, नंदकुमार म्हात्रे, शरद नाईक, राजेंद्र नाईक, शैलेश नाईक, तुषार पाटील, प्रशांत आमरे, उदय मोरे, निलेश म्हात्रे, मनिषा घरत, अर्पिता म्हात्रे, अंगणवाडी सेविका भारती पाटील, ॲड. मनिषा लोहार उपस्थित होत्या. प्रारंभी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी रवींद्र घरत, जितेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रणिता काबाळे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मनिषा घरत यांनी सौ. काळाबे यांचे औक्षण करीत मानाची साडी व खणानारळाने ओटी भरली.

दरम्यान, अनंत घरत यांनी देशाची नवी पिढी घडविण्याचे कार्य सौ. काबाळे यांनी 20 वर्षे अखंडितपणे केले, त्यांच्या कार्याला तोड नसल्याचे सांगितले. तर, ॲड. मनिषा लोहार यांनी आपल्या भाषणात अंगणवाडीत बल्यावस्थेतील शिक्षणाचा श्रीगणेशा प्रत्येक विद्यार्थी करीत असतो. आई वडिलांनंतरची अक्षराची ओळख करुन देणारी आणि छान छान गोष्टी सांगणारी अंगणवाडी सेविका अर्थात बाई असतात, असे सांगत सौ. काबाळे यांनी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर, रवींद्र घरत, जितेंद्र पाटील यांनी सौ. काबाळे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. मनिषा लोहार यांनी केले. शेवटी अल्पपोहाराचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version