प्रणिती शिंदेंनी गड राखला

| सोलापूर | वृत्तसंस्था |

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजपचा विजयरथ रोखला आहे. काँग्रेसनेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रणिती शिंदे यांना 4 लाख 33 हजार 392 मते मिळाली आहे. तर राम सातपुते यांना 3 लाख 61 हजार 868 मते मिळाली. प्रणिती शिंदे यांचा 71 हजार 524 मतांनी विजय झाला आहे. आकडेवारी अपडेट होत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी दोन तगडे आमदार रिंगणात होते. गांधी घराण्याचे विश्वासू माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे भाजपच्या या बालेकिल्ल्यात घुसण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. तर प्रत्येक वेळी उमेदवार बदलण्याची परंपरा पुढे नेत भाजपने पुन्हा आमदार राम सातपुते यांच्या रूपाने नव्या चेहऱ्यावर संधी दिली होती. दोघेही तरुण उमेदवार आहेत. एकीकडे वारसा जतन करण्याचे आव्हान होते तर दुसरीकडे किल्ला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान होते.

कर्नाटक आणि तेलंगणालालागून असलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला होता. आणीबाणीच्या काळातही येथे काँग्रेसला कोणीही हादरवू शकले नाही, मात्र, गेल्या 10 वर्षांत भाजपने येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे यांचा भाजपकडून दोनदा पराभव झाला आहे. मोदी लाटेत 2014 मध्ये निवडणूक हरल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिंदे यांना 2019 मध्ये दुसरा धक्का बसला होता. विधानसभेवर कुणाचे वर्चस्व -सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा लोकसभा आहेत.

सोलापूर-उत्तर भाजपचे विजयकुमार देशमुख आमदार आहेत. सोलापूरमध्य काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, सोलापूर दक्षिण भाजपचे सुभाष देशमुख, मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे यशवंत माने, अक्कलकोटमध्ये भाजपचे सतिन शेट्टी, तर पंढरपूरमध्ये समाधान आवताडे भाजपचे आमदार आहे. म्हणजे महायुतीचे विधानसभेवर वर्चस्व आहे. 2024 लोकसभा किती मदतान झाले? 2019च्या तुलनेत सोलापुरात 0.74 मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत 58.45 टक्के मतदान झाले होते. मंगळवारी (ता.7) लोकसभा निवडणूक 2024 साठी झालेल्या मतदान प्रक्रियेत 59.19 टक्के मतदान झाले आहे. सोलापुरात 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 0.74 टक्के मतांची वाढ झाली आहे.

Exit mobile version