| म्हसळा | प्रतिनिधी |
एव्हरेस्ट एबॅकस अकॅडमीतर्फे कल्याण ठाणे येथे राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा परीक्षा पार पडल्या. आयोजित ईव्हीई, ईएसटी स्पर्धा परीक्षेत म्हसळा तालुका पंचायत समिती माजी सभापती रविंद्र लाड यांची नात प्रार्थना सुशांत लाड हिने पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. प्रार्थना हिने हे यश संपादन करून म्हसळा तालुक्यासह शाळेचे नाव उज्वल केले आहे. एव्हरेस्ट एबॅकस अकॅडमी आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रार्थना सुशांत लाड हिचे महाराष्ट्र शासन सा. आरोग्य विभाग मुंबई उपसचिव विनोद घडेकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अप्पर सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभिजित लेंडवे, कोशोर पाटील सिनियर मॅनेजर हि.एस.आर. विभाग आदी मान्यवर उपस्थित होते. प्रार्थना सुशांत लाड हिने मिळवलेल्या यशाने तिचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.







