| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुळे गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रसाद अरुण थळे यांची सोमवारी निवड करण्यात आली. प्रसाद थळे हे माजी आमदार स्व. मधूशेठ ठाकूर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या निवडीबद्दल जिल्हा काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, समीर उर्फ हुनी ठाकूर, मालती ठाकूर, कमल ठाकूर, एस.एम.पाटील, अॅड. सुजय घरत, सतीश पाटील, सत्यजित धोपावकर आदींनी प्रसाद थळे यांचे अभिनंदन केले. अध्यासी अधिकारी तथा सरपंच सुहानी संतोष पाटील यांच्या अध्यक्षते खाली उपसरपंच निवडणूक पार पडली असून, यामध्ये प्रसाद अरूण थळे यांची मुळे ग्रा.पं.तिच्या उपसरपंच पदी निवड झाली. सदर उपसरपंच निवडणूक कामी निरीक्षक म्हणून गीतांजली पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती अलिबाग यांनी काम पहिले. एस.वाय.राऊत यांनी ग्रामपंचायत सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली.






