| खोपोली | प्रतिनिधी |
जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत कासार यांनी तब्बल 31 वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले आहे. नुकताच सेवानिवृत्त तसेच शुभेच्छा समारंभ उज्वल रंगमंच जनता विद्यालयात संपन्न झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक, कुटुंब, नातेवाईक, खोपोली शहरातील व्यापारी, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन प्रमुख पाहुणे केटीएसपी मंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासराव देशमुख, विद्यमान अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, मंडळाचे उपाध्यक्ष अबूशेठ जळगांवकर, संचालक यशवंत साबळे, दिलीप पोरवाल, अनंता हाडप, संजय पाटील, कैलास गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष अरूण पुरी, रविंद्र रोकडे तसेच कासार सरांच्या पत्नी आणि वडील उध्दवराव कासार आद मान्यवर उपस्थित होते.सर्वांचे स्वागत जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव यांनी केले.