। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमध्ये आज सकाळपासूनच मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून मतदारांकडून शांततेत मतदान सुरू आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुनीता नाईक, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक, माजी नगरसेवक ॲड. गौतम पाटील, वैशाली पाटील तसेच नगरसेवकपदाच्या उमेदवार साक्षी पाटील आणि अलिबागमधील डॉ. विनीत शिंदे यांच्यासह अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला.







