1 हजार किलो तांदळांची मदत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड-पोलादपूर तालुक्यातील दरड आणि पूरग्रस्त ग्रामस्थांच्या मदतीसाठी कृषीवलने सुरु केलेल्या एक हात मदतीच्या उपक्रमाला प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने एक हजार किलो तांदुळ देण्यात आली. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी कृषीवल टिमकडे सुपूर्द केले. यावेळी प्रशांत नाईक मित्र मंडळाचे अमित नारे, रवि थोरात, राजू प्यारेलाल जैन आदी उपस्थित होते. तर कृषीवलच्या वतीने निवासी संपादक माधवी सावंत, वृत्तसंपादक भारत रांजणकर, जाहिरात व्यवस्थापक हर्षा नाईक-पाटील, भैरवी पाटील-जाधव आदी उपस्थित होत.







