प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल विजयी

| अलिबाग | प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.अ‍ॅड. शिरीष पाटील स्मृतीचषक 40 षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल विरुद्ध उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये पनवेल संघाने उरणच्या संघावर विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत उरण संघाने सर्व गडी बाद 148 धावा काढल्या. तनिष्क पूजारीने सर्वाधिक 51, आर्यन निकाळजेने 27 धावा काढून संघाची धावसंख्या 148 पर्यंत पोहोचवली. पनवेल संघाकडून द्रुव शारदाने 3 तर तनिष्का शर्मा आणि आर्यन जाधव यांनी प्रत्येकी 2 फलंदाजी बाद केले. प्रत्युत्तरात पनवेलकडून मधल्या फळीतील फलंदाज श्रेय पाटीलने 59 व गांधार मानकामेने 29 धावांची खेळी करून संघाला विजयी मिळून दिला.

सामन्याचा सामनावीर म्हणून उत्कृष्ट गोलंदाजी करणार्‍या द्रुव शारदा, स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू तनिष्क पुजारी, इमर्जिंग प्लेअर श्रेय पाटील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुयश परांगे, नमित गायकर यांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रशांत माने, संदीप जोशी, मंगेश पवार, जयप्रकाश पाटील, समीर पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version