पोलादपूर तालुक्यात लक्ष्मीपूजनाला हिंदूबांधवांतर्फे नमाज

कालवली गावात अनोखी परंपरा
पोलादपूर | शैलेश पालकर |
संपूर्ण भारतात हिंदू मुस्लिम ऐक्यासंदर्भात वेगवेगळया घटनांची चर्चा असताना पोलादपूर तालुक्यातील कालवली जामा मशिदीत चक्क 65 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हिंदूबांधव नित्यनेमाने दरवर्षी न चुकता नमाज अदा करीत असल्याची आश्‍चर्यजनक परंपरा उघडकीस आली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने यावर्षी या परंपरेची प्रत्यक्ष खात्री केल्याने ही लक्ष्मीपूजन दिवाळीला होणारी नमाज हिंदू मुस्लीम आपसातील सदभावनेचे प्रतीक म्हणून संपूर्ण भारतवर्षात चर्चेत येण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे.
चिखलीतील बांदल यांचे काळवलीतील शिष्य गुरूवर्य सदूबाबू पार्टे तथा पार्टे बाबा आणि नानाबाबा वलीले यांच्यातील सख्य कसे झाले याबाबत कोणासही काहीही माहिती नाही. मात्र, नानाबाबा वलिले यांची ही परंपरा आजही कायम ठेवण्यास कालवली ग्रामस्थांनी सहकार्य केले आह
या पार्टेबाबांच्या शिष्यगणांपैकी भिवा पवार यांनी, काळवली, धारवली, हावरे, सवाद, मोरसडे, निगडे, करंजाडी, रूपवली, बारसगांव, कातिवडे, तुर्भे, तुर्भे खोंडा तसेच सुमारे तीन तालुक्यांमध्ये या शिष्यगणांचे अस्तित्व आहे.
यावेळी कालवली वलीले मोहल्ल्यातील अब्दुलहक खलफे, महमद उस्मान खलफे, मुराद इब्राहिम वलिले, अब्दुर्रज्जाक खलफे, कालवली गावाचे इमाम मौलाना अखलाख यांनी सर्व हिंदू बांधवांचे दरवर्षीप्रमाणे नमाज पठण केल्याबद्दल आनंद व्यक्त करून ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्याहस्ते हिंदूबांधवांना भेटवस्तू प्रदान केल्या.आगामी अनेक पिढयांमध्ये ही परंपरा कायम ठेवण्याची भूमिका यावेळी बुजूर्ग आप्पा पार्टे यांनी मांडली असता वलीले मोहल्यांतील मुस्लीम बांधवांनी जामा मशिदीमध्ये नमाज पढण्यास दरवर्षी स्वागत असल्याचे आवर्जून सांगितले.

Exit mobile version