प्रशासनाला वेध मान्सूनपूर्व तयारीचे

प्रांतांकडून कामांचा आढावा

| रसायनी | वार्ताहर |

खालापूर कर्जत चे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालय प्रमूख यांची बैठक आयोजित करून दरडप्रणव, धरणक्षेत्र, तलाव, धबधबे या ठिकाणी करावयाच्या उपाययोजना बाबत सविस्तर सूचना व मार्गदर्शन केले.

खालापूर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत सर्व खात्याच्या विभाग प्रमुख यांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे व आपल्या मोबाईल नंबर सह माहिती सादर करण्याचे आदेश दिले. सर्व विभागांनी नोडल अधिकारी यांची नेमणूक करणे, त्यांचा मोबाईल नंबर देणे आणि मोबाईल बंद न ठेवणे, विना परवाना मुख्यालय सोडू नये,तालुक्यात उद्भवणात येणार्‍या संभाव्य आपत्तीत तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश देण्यात आले. नैसर्गिक आपत्तच्या अनुषंगाने तहसिल कार्यालय खालापूर येथे चोवीस तास तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. 02192-275048 आणि 8262897888 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीस तहसिलदार आयुब तांबोळी, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली नगरपरिषद मुख्याधिकारी अनुप दुरे, खालापूर नगर पंचायत मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार, अग्निशमन दल प्रमुख आशिष मोरे, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडेकर, यांच्यासह खोपोली, रसायनी, खालापूर चे पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग चे राकेश राखाडे, मोरबे धरण प्रशासन, पाठबंधारे विभाग कर्जत, खालापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. रेश्मा नागरगोजे, सहायक अभियंता महावितरण खोपोली, खालापूर, रसायनी, चौक, कृषी अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख, वन विभाग, शिक्षण अधिकारी, भारत दूर संचार निगम, एकात्मिक बाल विकास, दुय्यम निबंधक, पशू वैद्यकिय विभाग, मंडळ अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 32 विभाग प्रमुख हे बैठकीला उपस्थित होते.

Exit mobile version