नाईक महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन

| कोर्लई | वार्ताहर |
मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मतदार जनजागृती-नोंदणी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. तहसील कार्यालयाचे निवडणूक नायब तहसीलदार अमित पूरी, पोलिस ठाण्याचे पो. शिपाई – परेश म्हात्रे, सचीन वाणी, प्राचार्य डॉ नगरबावडी, उपप्राचार्य डॉ.विश्‍वास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. एस. एस. भैरगुंडे, प्रा. डॉ. जी.डी. मुनेश्‍वर, प्रा. डॉ. जे. के. कांबळे, प्रा.डॉ. मधुकर वेदपाठक प्रा. डॉ. एन. एन. बागूल, प्रा. डॉ. सिमा नाहीद यांसह महाविद्यालयीन उपस्थित होते.

सुरुवातीला प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार अमित पुरी यांनी दि.1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी मतदार नोंदणी करण्यात आवाहन करण्यात येऊन मतदार जनजागृती व नोंदणी प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तर पोलिस शिपाई परेश म्हात्रे यांनी पोलिस भरती लेखी परीक्षा संदर्भात शारिरक चाचणी गुणांकन बाबतीत माहिती देऊन पोलीस भरतीसाठी सामान्यज्ञान (जनरल नॉलेज) याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एम.पी.गायकवाड यांनी तर प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्‍वर यांनी आभार मानले.

Exit mobile version