। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा बहिरीचापाडा येथे शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. लेझीम व ढोल ताशाच्या तालावर मान्यवरांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत माजी सरपंच डॉ. मनोज पाटील, सुनिल म्हात्रे, विक्रम पाटील, योगिता म्हात्रे, जयवंत म्हात्रे, पल्लवी पाटील, महेंद्र म्हात्रे, आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मिरवणूक शाळेच्या प्रांगणात येताच सुवासिनींनी मान्यवरांचे औक्षण केले. कार्यक्रमाविषयी अस्मिता म्हात्रे, सुनिल म्हात्रे, महेंद्र म्हात्रे ,गजानन म्हात्रे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती बहिरीचापाडा, पालक वर्ग व ग्रामस्थ मंडळ बहिरीचापाडा यांनी केले. प्रमोद म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी सतिश भगत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.






