जिल्ह्यात शाळा पूर्व तयारी अभियान सुरु

शंभर टक्के पटसंख्या नोंदणी करण्यावर भर, विद्यार्थ्यांची बौध्दीक, शारिरीक तपासण्या

| अलिबाग । प्रतिनिधी ।

विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी. लेखन, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील महाजने येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा पुर्व तयारी अभियान सुरु केले. या अभियानाच्या माध्यमातून मेळावा घेण्यात आला. पहिलीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची बौध्दीक, शारिरीक विकास क्षमता या मेळाव्यातून तपासण्यात आली. विद्यार्थ्यांसह पालकदेखील या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्यात शाळा पुर्व तयारी अभियान सुरु झाल्याने पालकांस विद्यार्थांमध्ये उत्साह निमार्ण झाला आहे.

अलिबाग तालुक्यातील महाजने येथील प्राथमिक शाळेमध्ये शाळा पुर्व तयारी अभियानांतर्गत बुधवारी (26 एप्रिल) रोजी मेळावा घेण्यात आला. नव्याने शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व खाऊ देऊन केले. नोंदणी कक्षामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी केली. विद्यार्थ्यांना शाळेतील वेगवेगळे साहित्य, शाळेत असलेली खेळणी, पक्षी, प्राण्यांच्या चित्रांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास, बौद्धिकविकास, भाषा विकास, सामाजिक व भावनिक विकास, गणन पूर्व तयारी याची माहिती देत पालकांना सखोल मार्गदर्शन शाळेचे शिक्षक प्रवीण गावंड यांनी केले. या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा रसिका पारंगे, सदस्या वैशाली जाधव, छन्नका भोनकर, अंगणवाडी सेविका संगिता पाटील, नम्रता पारंगे, प्रतिक्षा पाटील, पालक सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात 1 मेपर्यंत शाळा पुर्व तयारी अभियान असणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमध्ये शंभर टक्के पटसंख्या नोंदणी करण्यावर भर दिली आहे. या अभियानाद्वारे शाळांमध्ये मेळावे भरविण्यात आले आहे. यामध्ये पालक,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांचाही सहभाग राहणर असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी दिली.

Exit mobile version