। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील मढाळी बु. येथे सोमवारी (दि.15) 6 वर्ष पूर्ण झालेल्या दाखल पात्र विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करून शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
शाळेत येताना शाळेविषयी असलेली मनातील भीती कमी व्हावी, त्याचे शैक्षणिक भविष्य सुखकर व आंनदायी जाण्यासाठी शाळेत प्रवेशोसत्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेत प्रवेश घेणार्या नवीन चिमुकल्यांचे बँड पथक वाजवून स्वागत करण्यात आले. तसेच, या लहानग्यांना त्यांचे हात धरून बोलून शाळेत पहिले पाऊल टाकून व औक्षण करून त्याचे शाळेत प्रवेश करून घेतले.