| माणगाव | वार्ताहर |
माणगाव नगरपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून रायगड जिल्ह्यात नावलौकिक मिळविलेल्या रा.जि.प. शाळा उतेखोलवाडी येथे सन 2022-23 मध्ये शाळेत इयत्ता पहिलीत दाखल होणार्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी अभियान कार्यक्रमांतर्गत शाळापूर्व तयारी मेळावा मंगळवार, दि.19 एप्रिल रोजी सकाळी विविध मान्यवर, पालकवर्ग, शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास नगरसेविका रश्मी मुंढे, नगरसेविका सुविधा खैरे, शाळा व्यवस्थापन समिती उतेखोलवाडी अध्यक्ष दीप्ती मुंढे, शिक्षणतज्ज्ञ नामदेव खराडे, उपाध्यक्ष सौ. बुटे, सदस्या सौ. मोरे, सौ.जाधव, सौ. शेळके, मुख्याध्यापिका शमिका अंबुर्ले, शिक्षिका नंदिनी वाले, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका विनया जाधव, उपक्रमशील शिक्षिका स्नेहल उतेकर, पालक वर्ग, ग्रामस्थ उतेखोलवाडी सामाजिक कार्यकर्ते संतोष खैरे विद्यार्थी वर्ग व दातृत्व वर्ग यांनी उपक्रमशील शिक्षक वर्गाचे कौतुक केले.