मुरुड पालिका शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा

| कोर्लई | वार्ताहर |

मुरूड नगरपरिषदेच्या मराठी शाळा नं. 2 मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (पनवेल) व पंचायत समिती (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शाळापूर्व तयारी अभियान मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यास नगरपरिषद मुरूड प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा रोहिणी सावकार, उपाध्यक्ष रोहन निशाणदार सदस्य पांडुरंग चव्हाण, सदस्या नैनिता कर्णिक केंद्र प्रमुख राजेश भोईर मुख्याध्यापक दिनेश भोईर, सायली गुंजाळ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक दिनेश भोईर यांनी प्रास्ताविक केेले. यावेळेस नावनोंदणी, मार्गदर्शन, उद्बोधक कक्षाची निर्मिती करण्यात आली. मेळावा यशस्वी करण्यासाठी मानसी नाईक, समृध्दी डोंगरीकर यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. सायली गुंजाळ यांनी आभार मानले.

Exit mobile version