। कोर्लई । वार्ताहर ।
अंगणवाडीतून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांकडून शाळापुर्व तयारी करून घेतली जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शाळापुर्व तयारी राबविण्यात येते. या निमित्ताने विद्यार्थ्यांना घोड्यावरून रपेट करण्यात आली.
अंगणवाडीतून पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना शाळेची ओळख व्हावी यासाठी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घ्यावे. यासाठी हे अभियान राबविण्यात येते. या अभियानात मुलांनी उत्साहात सहभाग घेतला व याला पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कोळी, शिक्षिका अनिता कोळी, महादेव शिंदे व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जाणू दुसार, गोविंद हिरवे, सोनाली हिरवे, भारती शिंदे, सुनिता शिंदे, नामदेव शिंदे, लक्ष्मण शिंदे, पोलिस पाटील पानंगळे व अंगणवाडी सेविका, महिला वर्ग उपस्थित होता.