| म्हसळा । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा येथे उप विभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीवर आधारीत गरुडझेप अंतर्गत विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. तालुक्यातील एकूण 180 प्रशिक्षणार्थिनी या शिबिराचा लाभ उठविला. याप्रसंगी रोहा येथील द्रोणाचार्य करिअर केंद्राचे तज्ज्ञ मार्गदर्शक स्वप्नील सकपाळ, तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे, निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे, महसूल तहसीलदार धर्मराज पाटील, मंडळ अधिकारी रविंद्र उभारे, मंडळ अधिकारी एस. के. शहा, म्हसळा तलाठी कैलास पाटिल,अंजुमन हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज चे प्राचार्य मोहंमद तांबे,डॉ. मुबशीर जमादार आदि मान्यवर उपस्थित होते.