शाडूच्या गणेश मूर्तींना पसंती

यंदा साधेपणाने गणेश उत्सव साजरा होणार
। उरण । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशौत्सव साजरा करतांना शासनाने काही नियम अटी अति आखून दिल्या आहेत. त्या नुसार गणेश मंडळांनी शासनाच्या आदेशानुसार 4 फुट पेक्षा कमी उंचीच्या मूर्ती बसवाव्यात असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.तसेच मिरवणुका कढू नये मंडळाच्या परिसरात मूर्तीचे तर घरगुती गणपती घरीच विसर्जन करावेत असे अवाहन देखील करण्यात आले आहे.यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पेक्षा शाडूच्या मूर्तीला उरणमध्ये गणेश भक्तांची मागणी मोठ्या प्रमाणात,मागणी आहे.10 सप्टेंबर (गणेश चतुर्थी)ते 19 सप्टेंबर (अनंत चतुदर्शी )या काळात राज्यात सार्वजनिक आणि घरगुती गणेशौत्सव साजरा केला जाईल सदर गणेशौत्सव साजरा करण्यासठी राज्य सरकारच्या वतीने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.गणेशौत्सावास थोडेच दिवस राहिल्याने उरणतालुक्यात चिरनेर,करंजा ,मुलेखंड ,केगाव ,बोकड वीरा,उरण,डाऊर नगर करळ,सोनारी आदी ठिकाणी गणपतीचे कारखाने आहे .त्या ठिकाणी कारागीर मूर्ती बनविण्यात मग्न झाले आहेत .

उरण तालुक्यातील डाऊरनगर येथील चिंतामणी कला केंद हे पाच वर्षा पासून शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे.यंदा घरगुती दोन फुटी व सार्वजनिक चार फुटीपर्यंत शाडूच्या मातीपासून गणेशाची मूर्ती बनविण्यात येणार आहेत जून महिन्यापासून काम सुरु केल आहे.त्याच प्रमाणे दुर्गा माता देवीच्या मूर्ती हि बनविल्या जातात या कामात माझा भाऊ प्रथमेश देसाई मदत करीत आहे .असे चिंतामणी कला केंद्राचे हर्षल विलास देसाई यांनी सांगितले .

गणेश मुर्तीकारांवरील विघ्न अजूनही टळलेले नाही. राज्य शासनाने गतवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवावर निर्बंध घातल्यामुळे मूर्तिकार चिंतेत आहेत. दरम्यान, घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 2 आणि 4 फूट अशी अट घालण्यात आल्यामुळे मोठ्या मूर्तीचे करायचे काय? असा सवाल उरण तालुक्यातील काही मुर्तीकारांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट कायम आहे. याच पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फुटांची, तर घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांची असावी, अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.मूर्ती घडविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version