दुचाकीवरून पडून गर्भवती महिलेचा मृत्यू

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

गावाहून कोकणात जात असताना खारेपाटण जि. सिंधुदुर्ग येथे दुचाकीवरून जाताना चक्कर येऊन पडून भाटिवडे येथील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. सारिका आकाश देसाई (28) असे या महिलेचे नाव आहे. ओटी भरणी कार्यक्रम करून त्या कोकणात चालल्या होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी सारिका देसाई या ओटी भरणीच्या कार्यक्रमासाठी कोकणातून गावाकडे आल्या होत्या. ओटी भरणी कार्यक्रम करून त्या पती आकाश देसाई हे नोकरीच्या निमित्ताने कोकणात असल्याने तिकडे चालल्या होत्या. भुईबावडा-खारे पाटणदरम्यान गाडीवरून जात असताना चक्कर येऊन त्या पडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गर्भवती महिलेच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सारिका यांचा चार वर्षांपूर्वी आकाश यांच्याशी विवाह झाला होता.

Exit mobile version