। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाची सुरूवात झाली. शाळा सुटण्याच्या दरम्यानच पाऊस सुरूवात होताच विद्यार्थ्यांसह पालक आणि बाजारहाटीसाठी आलेल्या नागरिकांची तारंबळ उडाली मिळेल तिथे आडोसा घेत थांबले होते. काहीवेळाने जोरदार पाऊस सुरू होताच लोकं सुखावली असली तरी वीटभट्टीवाल्याचे मोठे नुकसान होवू शकतो अशी मत वर्तवला जात आहे. पावसाच अंदाज लक्षात येताच काहीजण छत्री घेवून निघाले असले तरी विद्यार्थ्यांनी भिजण्याचा आनंद घेतला आहे.काही संत तर थोड्यावेळाने पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसून आले.
कर्जतमध्ये पावसाच्या सरी
कर्जतमध्येही अवकाळी पावसाने बुधवारी सुमारे अर्धा तास गडगडासह हजेरी लावली. गेल्या आठ -दहा दिवसा पासून थंडी गायब होवून उन्हाच्या झळा जाणवू लागतं होत्या, नेहमी सारखा आजपण उन्हाळा जाणवत होता, दुपार पासून पावसा सारखे वातावरण झाले होते, सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने ढगांच्या कडकडासह सुरुवात केलीत्यामुळे वातावरणात मातीचा सुगंध दरवळत होता.







